काटी : उमाजी  गायकवाड

कोरोनाने जगभर थैमान घातले असल्याने उदरनिर्वाहासाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर आदी ठिकाणी गेलेले लोक आपल्या मूळ गावी काटी येथे येऊ लागले आहेत. अशा  गावी येणाऱ्या प्रत्येकांची येथील एस.टी. स्टॅण्डवर कोरोना सहाय्यता कक्षाच्या वतीने कसून चौकशी करित आपल्या रजिस्टरमध्ये आलेल्या लोकांच्या नोंदी घेण्यात येत असून प्रत्येकाला येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात जाऊन तपासणी करण्यासाठी सांगितले जात असून घरच्या बाहेर न पडल्याच्या सुचना केल्या जात आहेत. जीवावर उदार होऊन या राष्ट्रीय आपत्तीत कोरोना सहाय्यता कक्षातील सदस्य तलाठी प्रशांत गुळवे, मु.अ. एस. एम. संगमनेरकर, संजय जाधव, पोलीस पाटील सौ. म्हेत्रे, सहशिक्षक सुनिल खेंदाड, तानाजी शेळके, पंकज काटकर, हेरार काझी,  अनिल बनसोडे, प्रशांत सुरवसे, विष्णु कांबळे, विलास सपकाळ आदी सदस्य कोरोनाविरोधी जैविक युध्दात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत.कोरोना सहाय्यता कक्षाच्या वतीने गावनिहाय बाहेरून आलेल्या लोकांच्या याद्या तयार करणे, आजारी असतील तर त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेणे, कोरोनाबाबतची जनजगृती करणे ही कामे गाव आणि आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचा दुवा म्हणून व आपले गाव हेच आपले कुटुंब या भावनेने अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. 18 मार्च ते 30 मार्च या कालावधीत 236 जणांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
 
Top