काटी : उमाजी गायकवाड

मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर संचलित, " तुळजापूर तालुक्यातील येडेश्वरी कन्या प्रशाला काटी ही प्रशाला बंद आहे. हा लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक यांच्या संकल्पनेतून  विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहे. त्या ग्रुपवर विद्यार्थ्यांना दररोज अभ्यासक्रमाचे व्हिडिओ पाठवले जातात. तसेच ग्रुपवर अभ्यास दिला जातो. विद्यार्थी त्यांना येणाऱ्या   अडचणी किंवा शंका ग्रुपवर सोडहुन देतात व  ते पाहून त्या-त्या विषयाचे शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात. ह्या मध्ये सर्व विद्यार्थीची ऑनलाईन हजेरी घेतली जाते व सर्व विद्यार्थी  नियमित हजेरी देतात.    
       
  या ग्रुपवर विद्यार्थ्यांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ विजया पाटील व शिक्षक श्री सुनील खेंदाड, श्री दिगंबर कदम, श्री किशोर बनसोडे, श्री गणेश गुंगे, श्री तुकाराम गवळी ते शिकवत असलेल्या विषयाचे मार्गदर्शन करतात. यासाठी _मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री मनोहरपंत सपाटे व शालेय समिती चेअरमन श्री विनायकराव पाटील_ यांचे मार्गदर्शन लाभले.     

         या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे समस्त काटी ग्रामस्थ व पालकांकडून कौतुक केले जात आहे.
 
Top