काटी : उमाजी गायकवाड
काटी येथे शनिवार दि. (11) रोजी दुपारी पाण्याअभावी दोन वानराने गावात प्रवेश करुन तहानेने व्याकूळ झालेल्या वानराने बांधकामासाठी ठेवण्यात आलेल्या बॅरेलमध्ये अवघडलेल्या अवस्थेत वाकून पाणी प्यावे लागले.
तुळजापूर तालुक्यातील काटी परिसरात आटत चाललेला पाणी साठा यामुळे शनिवारी दुपारी दोन वानराने गावात प्रवेश करीत पाण्याच्या टिपेवर अवघडलेल्या अवस्थेत पाय ठेवून पाणी प्यावे लागले.
शनिवारी दुपारी काटी येथे गावात दोन वानरांनी शिरकाव केला त्यामुळे वृध्द घरातील आजीची चांगलीच तारंबळ उडाली. लॉकडाऊनमुळे लोक लोक घरीच असल्याने व दुपारची वेळ असल्याने पाहणाऱ्यांनी देखील आपापल्या दारात गर्दी केली होती. पोटभर पाणी प्यायला मिळाल्यानंतर हे वानर मात्र पुढच्या वाटेने निघुन गेले. जंगली प्राणी पक्षी यांच्यासाठी समाजातील काही घटकांनी पुढे येऊन काही तरी उपाय योजना करावी किंवा आपापल्या शेतात पाणवठे तयार करून वन्यप्राण्यांची पाण्याची सोय करावी अशी मागणी प्राणी मित्रांकडून होत आहे.