सिंधुदुर्ग : सुरेश कौलगेकर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीनी कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी घरातील लाईट बंद करुन दिव्यांचा झगमगाट करण्याचे आव्हान एक सघतेचे प्रतिक दर्शवण्यासाठी केले होते. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग वासियांनी दीप प्रज्वलन, मेणबत्ती व मोबाईल टॉर्च लावून तर काही ठिकाणी शेतकरी कुटुंबानी तुळशी वृंदावनच्या ठिकाणी व मंदिरे दिव्यांनी प्रकाशमय करत कोरोना विरोधात एकजुटीचा लढा देण्याच्या मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. तसेच फटाके फोडून काही ठिकाणी प्रतिसाद दिला. वेंंगुर्ले येथील मारुती मंदीर स्टॉप येथील तीन गदाचे मारुती मंदीर येथे गुड बाय कोरोना असा संदेश देत  " गुड बाय कोरोनाच्या आकाराच्या पणत्या "लावून कोरोनाशी लढण्याचा संदेश दिला.

तर  भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश प्रभु आपल्या निवासस्थानी सहकुटूंब दिवे लावून मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद दिला.. तर शिवसेनेचे नेते दिपक केसरकर यांनी निवासस्थानी सहकुटुंब दिवे लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला.
 
Top