नळदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला घरातील लाईट बंद करून घरात, अंगणात, गॅलरीमध्ये किंवा रस्त्यावर दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावण्याचं आवाहन देशातील जनतेला केलं होतं. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे नागरिकांनी पाठिंबा देत रात्री 9 वाजता घरातील लाईट घालवून दिवे लावले आणि कोरोना विरोधातील आपली एकी दाखवून दिली. यावेळी अणदूर येथील माजी सैनिक अनिल वामनराव घुगे यांनी आपल्या घरी दिवे लावून पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
