तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
सोलापूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.या कोरोनो संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तुळजापूर तालुक्यातील वडगाव काटी येथे तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांना ग्रामस्थांना सतर्क राहुन खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
सोलापूर जिल्हाच्या सीमेवर तुळजापुर तालुक्यातील वडगाव काटी हे गाव असुन या गावातील नागरीकांचा नागरिकांचा सोलापूरशी अधिक संपर्क येतो. सध्या सोलापूर शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे.शहरामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी न होता वाढतच चालली आहे.यामुळे येथील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.आपला उस्मानाबाद जिल्हा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांच्या प्रयत्नाने कोरोनामुक्त झाला असुन तो असाच कोरोनोमुक्त ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे व गावातील दुधविक्रेत्यानी सोलापूर या ठिकाणी जाऊन दुधविक्री करण्याचे टाळावे हा कोरोनोचा संसर्ग कधी,कोणापासुनही येऊ शकतो त्यामुळे वडगाव काटी ग्रामस्थांनी सतर्क राहुन खबरदारी घ्यावी व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यानी केले आहे.
यावेळी पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड,ग्रामसेवक चौगुले, सरपंच मुलाणी,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायतचे कर्मचारी, मुख्याध्यापक चेंडके
राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत चुंगे, कुलस्वामिनी सुतगिरणीचे संचालक गौरीशंकर कोडगीरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.