वागदरी : एस.के.गायकवाड 

तुळजापूर, तालुक्यातील मौजे गुजनूर येथे अंगणवाडीतील बालकांच्या पालकाना पुरक पोषण आहारचे किट व येथील प्रत्येक कुटुंबाना सानिटायझरच्या बाँटलचे वाटप करण्यात आले.
   
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पुकारण्यात आलेल्या लाँकडाऊन व संचार बंदीच्या काळात एकात्मिक बालविकास य़ोजने अंतर्गत शासनाच्या वतीने चालविण्यात येनाऱ्या अंगणवाडीतील एकही बालक पुरक पोषण आहारापासुन वंचित राहू नये म्हणून शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस मार्फत अंगणवाडीतील बालकांच्या पालकाना अंगणवाडीत बोलावून फिजिकल अंतर ठेवून पोषण आहारासाठी लागणारे तांदूळ ,डाळी,हळद वगेरेचे किट वाटप करण्यात आले.
     
तसेच स्वच्छतेच्या द्रष्टीणे हात धुन्यासाठी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने १४ व्या वित्त आयोतुन प्रत्येक कुटुंबाला सानिटायझरच्या बाँटलचे वाटत करण्यात आले. याप्रसंगी कोरोना साहय्यता कक्ष समितीचे कक्ष प्रमुख तथा ग्रामसेवक कुंभार सह व्यंकट साळुंके, उपसरपंच सूरज साळुंके, पोलीस पाटील किशोर वाघमारे, आशा कार्यकर्ती अंजली जयभीम वाघमारे, अंगणवाडी कार्यकर्ती ललीता साळुंके उपस्थित होते.
 
Top