मुरूम : भुसणी,ता.उमरगा येथील ग्रामस्थांकडून  ऑनलाईनद्वारे २२ हजार ४९० रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी बुधवारी (ता.२९)रोजी ऑनलाईनद्वारे पाठविण्यात आले.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लाँकडाऊन तीन मे पर्यंत आहे आणि पुढे किती दिवस वाढेल हे सांगता येत नाही तेव्हा   गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि आर्थिक मदत व्हावी.अशा संकटाच्या प्रसंगी सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून कोविड-१९ साठी गावातून युवकांनी आरोग्यविषयक नियमांचे पालन करून घरोघरी जावून बॉक्सच्या माध्यमातून निधी संकलन केले.

परमेश्वर माळी,उमाकांत बिराजदार,बालाजी संगसट्टे,शिवानंद धोत्रे, बसवराज संगसट्टे,सागर मंडले,महेश संगसट्टे, शिवानंद संगसट्टे,अनिल बिराजदार,गौरीशंकर पाटील,अमोल बिराजदार,नागेश बिराजदार,कंटप्पा संगसट्टे,वीर जामगे, मल्लिनाथ बिराजदार,भीमाशंकर पांचाळ आदींनी पुढाकार घेऊन वर्गणी जमा केल्याने गावातील ज्येष्ठ नागरिकांमधून या युवकांचे कौतुक करण्यात आले.
 
Top