काटी :- उमाजी गायकवाड

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव भारतात व महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेला असतांना तो रोखण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र शासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहे. संबंध देशासह महाराष्ट्रात सर्वत्र संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने एकीकडे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून, देवदूत बनून पोलीस प्रशासन, वैद्यकीय स्टाफ, स्वच्छता कर्मचारी हे अत्यावश्यक सेवा देत आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत या लोकांचे  तर दुसरीकडे हातावरचे पोट असलेल्या लोकांचे, मनोरुग्णांचे, गोरगरीबांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्या अनुषंगाने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आपणही समाजाचे काही तरी देणे आहोत ही भावना ठेवून येथील नाझ फाऊंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. अनिस मुजावर, डॉ. युसुफ मुजावर अणि डॉ.वासिक काझी यांच्या वतीने मंगळवार दि.(7) रोजी जागतिक दिनाचे औचित्य साधून तामलवाडी आणि सोलापूर पोलीस, सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, हुमा मेडिकल मधील कर्मचारी यांना सॅनिटायझर, मास्क, आणि 80 किलो द्राक्षांचे वाटप करण्यात आले. तर  सोलापूर सिव्हिल आणि रेल्वे  स्टेशन परिसरात फुटपाथवर फिरणाऱ्या मनोरुग्णांना, ज्यांच्या डोक्यावर छत नाही, निराधार आहेत अशा गोरगरिबांना द्राक्षांचे वाटप करण्यात आले.


ढगे जनरल स्टोअर्सच्या वतीने दिड हजार बिस्कीटांचे वाटप

येथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा पेपर विक्रेते विद्यासागर ढगे यांच्या वतीने बुधवार दि. (8) रोजी तामलवाडी पोलीसांना आणि गरजूंना  वाटप करण्यासाठी तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांचेकडे दिड हजार पारले बिस्कीटे देण्यात आली. यावेळी सपोनि नितीन मिरकर, विद्यासागर ढगे, विक्रम देशमुख, सरपंच आदेश कोळी, प्रदीप साळुंके, बाळासाहेब भाले उपस्थित होते. 

यावेळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मिरकर यांनी कोरोनाच्या संकटावेळी केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त करून सध्या सर्वत्र संचारबंदी कायदा लागू करण्यात आल्याने त्‍याचे पालन करीत घरी रहा, समाजामध्ये या विषयी जागृती करा आणि कोरोना विषयी काळजी घ्या, सुरक्षीत राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
 
Top