काटी :  उमाजी गायकवाड  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या देवदूतांच्या मदतीला दुबईतील रामहरी उर्फ बाळासाहेब मारूती लोंढे यांचे कुटुंबीय धावून आले. मागील 22 वर्षांपासून सर्व सामान्य कुटुंबातील रामहरी उर्फ बाळासाहेब लोंढे हे नौकरी निमित्त दुबईत स्थाईक आहेत.  

काही व्यक्तींमध्ये उपजतच वेगळे गुण दिसून येतात. अशा व्यक्तींची इतरांसाठी काहीतरी करण्याची नेहमीच धडपड असते.असाच काटी येथील  एक उमदा तरूण परदेशात नोकरी करीत  सामाजिक बांधिलकीचे व्रत जोपासत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने व समाजसेवेची असणारी आवड आणि इतरांसाठी काही तरी करायची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नसल्याने आपल्या मायभूमीतील पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांना सामाजिक बांधिलकीतून आपल्या परीने सेवा करण्यासाठी हात पुढे करून मायभूमीशी असलेले नाते जपत  परदेशातसुध्दा आपली मराठी अस्मिता जपत आहे. सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव भारतासह महाराष्ट्रात वाढत आहे. नौकरीसाठी रामहरी लोंढे दुबईत असले तरी देशाविषयी असणारी आत्मियता, प्रेम, येथील नागरिकांची असणारी काळजी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.  या कालावधीत जीवावर उदार होऊन लोकांची काळजी घेणाऱ्या पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर आहे. लॉकडाऊनच्या काळातही पोलिस, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी देवदुतांप्रमाणे आपलं कर्तव्य चोख पार पाडत आहेत. अशावेळी तहानभूक हरपून ते काम करतात. मात्र अन्न पाण्याअभावी त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दुबईत असूनही कुटुंबिय व मित्रपरिवाराच्या माध्यमातून गुरुवार दि. 2 रोजी तामलवाडी पोलीस ठाण्या अंतर्गत कार्यरत असलेल्या 40 पोलीस अधिकारी, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांची मिठाई बॉक्स, पाणी बॉटल देऊन नाष्ट्याची सोय करून त्यांच्या विषयी असणारी कृतत्नता व्यक्त केली. त्याच प्रमाणे सोलापूर येथे रेल्वे स्टेशन, शासकीय रूग्णालय, बसस्थानक परिसरात फिरणाऱ्या मनोरुग्णांच्या जेवणासाठी काटी येथील नाझ फाऊंडेशनला 5000/-हजार रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले.


   जीवावर उदार होऊन सुरक्षेचे कर्तव्य असताना पोलिस, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी  नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी जनजागृती करीत आपल्या कुटुंबापासून दूर राहून दिवसरात्र मेहनत घेत आहेत. अशा पोलीस बांधवांचे, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे व देवतूतासारखे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सहकार्य करणे, मदतीचा हात देणे हि प्रत्येकांची सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगत त्यांनी सर्वांच्या नाष्ट्याची सोय केली.  विविध  सेवाभावी सामाजिक संस्थांनी पुढे येऊन अशा लोकांची सेवा करण्याचे आवाहन दुबईतून रामहरी लोंढे यांनी केले.

   शासकीय नियमांचे पालन करीत कर्तव्याच्या ठिकाणी काटीसह सावरगाव, तामलवाडी या ठिकाणी जाऊन मिठाई किटचे वाटप करण्यात आले. दुबईत राहूनही मायभूमीसाठी असणारी तळमळ, केलेल्या सेवेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

      यावेळी माजी सभापती शिवाजीराव गायकवाड, रामहरी लोंढे यांच्या पत्नी सौ.उषा लोंढे, मुलगा सुमित लोंढे, मुलगी गायत्री लोंढे सरपंच आदेश कोळी, तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मिरकर, डॉ. अजित राठोड,  पत्रकार उमाजी गायकवाड, माजी सरपंच अशोक जाधव, डॉ. अनिस मुजावर, प्रदीप साळुंके, सुजित हंगरगेकर, मकरंद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top