नळदुर्ग, दि. ०२ : 

जि.प.प्राथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येथे शिल्लक तांदूळ, डाळी व कडधान्याचे वाटप करण्यात आले.
     
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा  (कोव्हीड-१९)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व शाळा, महाविद्यालये ,अंगणवाड्या साथरोग प्रतिबंध कायदा सन १८९७ अन्वये निर्गमित केलेल्या अधिसूचना ,नियमावलीतील तरतुदी नुसार  दि.३१/ मार्च / २०२० पर्यंत बंद ठेवण्यात आले होते, परंतु केंद्र सरकारने पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि.१४/एप्रिल /२०२०पर्यंत देशात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन सर्वत्र संचार बंदी करून जनता कर्फ्यु  लागु केल्याने सध्या सर्व,शाळा महाविद्यालये,अंगणवाड्या बंद आहेत. या बंद काळात विद्यार्थी पोषण अहारापासुन वंचित राहू नये म्हणून शाळेत शिल्लक राहिलेले तांदूळ, डाळी व कडधान्याचे समप्रमाणात वाटप करण्यात यावे असे परिपत्रक शासनाने सर्व शाळाना दिले आहे. त्या परिपत्रका नुसार वागदरी येथील जि.प.प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून दोन पालकांमध्ये एक मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवून वर्गनिहाय टप्प्याटप्प्याने तांदूळ, डाळी व कडधान्याचे समप्रमाणात वाटप करण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जत्ते,सहशिक्षिका रेखा साखरे, एम.आर.चौधरी, सहशिक्षक टि.एम.लोहार, के.व्ही.जावळे ,कोरोना सहाय्यता कक्षप्रमुख तथा ग्रामसेवक जी.आर.जमादार, सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, ग्रा.प.सदस्य रावसाहेब वाघमारे, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते एस.के.गायकवाड, दत्ता पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, उपस्थित होते.
 
Top