तुळजापूर, दि. १६ :

  उस्मानाबाद येथे होणार्या कोवीड 19 तपासणी प्रयोगशाळेचा उभारणी साठी  तुळजापूर खुर्द येथील तुळजाई पतसंस्थेच्या वतीने 51 हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे.  लोकसहभागातून उभारण्यात येणार्या प्रयोगशाळेसाठी तुळजाई पतसंस्थेच्या वतीने  जिल्ह्यातून पहिली मदत ठरली आहे. 

     जगभरात धुमाकूळ घालणार्या जागतिक महामारी कोरोना रूग्णांची तपासणी तातडीने आणि जलद होण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रात कोवीड 19 प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. लोकसहभागातून उभारण्यात येणार्या या प्रयोग शाळे साठी सहकारी संस्थांचे उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी मदत करण्याचे आवाहन केले होते. देशमुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तुळजापूर खुर्द येथील तुळजाई पतसंस्थेच्या वतीने शुक्रवार (दि. 15) 51 हजार रूपये मदतीचा धनादेश पतसंस्थेचे व्हा. चेअरमन राजाभाऊ देशमाने यांनी उपनिबंधक देशमुख यांच्या कडे सपूर्द केला. यावेळी पतसंस्थेचे सचिव संजय ढवळे, प्रा. निलेश एकदंते, सचिन माळी आदींची उपस्थिती होती. 

 ● कोरोना चा लढाईत पतसंस्थेच्या वतीने भरीव योगदान 

 तुळजाई पतसंस्थेच्या वतीने लाॅकडाऊन आणि संचारबंदी मुळे अडचणीत सापडलेल्या गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे 375 किट चे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय संस्थेच्या वतीने परिसरातील 500 घरा मध्ये हॅन्ड वाॅश आणि डेटाॅल साबनाचे वाटप करून कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या वतीने नागरिकांना हॅन्ड वाॅश ची व्यवस्था करण्यात आली आहे. 


 
Top