तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेच्या नगरीत दि. १६ शानिवार रोजी विजेच्या कडकड्यासह मुसळधार पाऊस झाला.

 शनिवार रोजी  दुपारी १/३० सुमारास  तुळजापुरात हवामानात अचानक बदल  झाल्यामुळे वादळी वार्यासह विजेच्या कडकड्यात मुसळधार पाऊस झाला सध्या में माहिना असल्याने  उन्हाचे चटके नागरीकांना सहन करावे लागत होते उन्हांच्या वाढत्या पार्या मुळे नागरीक हैराण झाले होते. शनिवारी पाऊस झाल्याने अनेक नागरीकांना थोडा थंडावा निर्माण झाल्याचे दिसुन आले.

 शहरात या पाऊसामुळे शहरात रस्त्यावर पाणी ओसांडून वाहत होते. या पाऊसामुळे शहरातील रस्ते स्वच्छ झाले होते.त्याचबरोबर पावसाळ्या पुर्वी शहरातील नाल्या न.प. कडून स्वच्छ करण्यासाठी आतापासुनच तयारीला लागले पाहिजे सध्या कोरोना वायरस चा पादुर्भाव असल्यामुळे पावसाळ्या पुर्वी न.प.कडून शहरातील सर्वच भागात स्वच्छता केली पाहिजे कारण पावसाळ्यात साथी चे रोग पसरु नये या साठी न.प.कडून आतापासुन जय्यत  तयारी केली पाहिजे अशी नागरीकातुन चर्चा होत आहे आपले तुळजापुर शहर कोरोना वायरस च्या महामारीत असल्याने न.प. प्रशासना ने पावसाळ्यात शहरातील नागरीकांची आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
 
Top