तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 कोरोना विरोधात लढणा-या शेतकऱ्यांच्या सन्मानसाठी स्वाभीमानी शेतकरी संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजु शेट्टी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तुळजापूर तालुक्यातील अनेक  गावातील शेतकऱ्यांनी बैलजोडी सह  कृषी अवजारे घेवुन घराबाहेर उभे राहुन शेतकऱ्यांचा हितासाठी शनिवारी सकाळी नऊ वाजता  प्रार्थना  केली.



काही शेतकऱ्यांनी बैलजोडी  बैलगाडी  सह स्वाभीमानीशेतकरीसंघटना चे त्यावर झेंडे लावुन सकाळी नऊ वाजता दहा मिनीटे प्रार्थना केली. या सन्मानास ग्रामीण भागातुन शेतशिवार वस्तांनवर मोठा प्रतिसाद लाभला.

कोरोना विरुध्दचा लढाईत पोलिस आरोग्य  कर्मचाऱ्यांन इतकाच शेतकरी वर्ग ही कोरोना योध्दा म्हणून लढत असल्याने कोरोना विरोधात लढणा-या या शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शेतकऱ्यांनी बैलबारदानासह सह सहकुंटुंब घराबाहेर येवुन प्रार्थना केली.

   शेतकरी  कोरोना योध्दाचा सन्मान करण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर येऊन शेतीअवजारे आपल्या हातामध्ये घेऊन त्यांच्यासाठी केल्या बद्दल   स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी जिल्हा वासीयांचे आभार मानले .
 
Top