तुळजापूर,  दि. १७ :

  उस्मानाबाद येथे होणार्या कोवीड 19 तपासणी प्रयोगशाळेचा उभारणी साठी  तुळजापूर  येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचारी पत संस्थेच्या वतीने वतीने 51 हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. 

     जगभरात धुमाकूळ घालणार्या जागतिक महामारी कोरोना रूग्णांची तपासणी तातडीने आणि जलद होण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रात कोवीड 19 प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. लोकसहभागातून उभारण्यात येणार्या या प्रयोग शाळे साठी सहकारी संस्थेचे निबधंक विश्वास देशमुख यांनी मदत करण्याचे आवाहन केले होते. देशमुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तुळजापूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी  पतसंस्थेच्या वतीने शनिवार (दि.१६) 51 हजार रूपये मदतीचा धनादेश म.रा.वि.मंडळाचे कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन प्रविन रत्नपारखे, सचिव नागनाथ चव्हाण ,संचालक नितीन जाधव,शिवाजी कामठे प्रसाद महामुनी यांनी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक  राजेंद्र देवकते यांच्या कडे सपूर्द केला.

 
Top