उस्मानाबाद, दि. २४ :
उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार दिनांक २४ मे रोजी पुन्हा नवे सहा रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आले. यामध्ये उस्मानाबाद शहरातील दोघांचा तर उमरगा तालुक्यातील तीन व परंडा तालुक्यातील एकाचा समावेश आहे..
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज रविवार रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ६ ने वाढली आहे. रविवार रोजी एकूण ४७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३६ अहवाल निगेटिव्ह तर सहा अहवाल पाॅझिटिव्ह व सहा अहवाल inconclusive आले आहेत. आता उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही ३५ पोहचली आहे.
