तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी शहरातील मुस्लीम बांधवाना ईद च्या शुभेच्छा दिल्या., या वर्षी प्रथमच ईदवर कोरोनाच सावट असल्यामुळे शहरातील मुस्लीम बांधवानी घरात राहुनच नमाज अदा करावे, कोरोनाच संकट दुर होण्यासाठी दुवा करा, ईद ची नमाज घरातुनच करा रस्त्यावर न येता गर्दी न करता राज्याच्या व राष्ट्रांच्या जगाच्या समृद्धीसाठी दुवा करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. कल
मुस्लिम बांधवांच रमजानचा महिना गेल्या एक महिन्यापासून चालू आहे आणि आज शेवटच्या टप्प्यात आहे. कोरोना रोगाचा आजार पसरू नये म्हणून आपण मशिदींमध्ये नमाज न पठन करता आपन आपल्या घरी नमाज पठन केले. आशा प्रकारे आपण शासनाच्या आवाहनाचे पालन करत सहकार्य केले. यामध्ये मशिदींचे इमाम, उलामा आणि समाजातील जबाबदार व्यक्ति यांनीही खूप मदत केले आहे. सोमवारी ईद जगभरात साजरा होणार आहे. आम्हाला माहित आहे की ईद हा मुस्लिमांचा सर्वात महत्वाचा धार्मिक सण आहे. हा सण भारतासह संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
ईदच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात आणि विशेषता: ईदगाह व मशिदींमध्ये सकाळी ईदची नमाज अदा करण्यासाठी येतात परंतु कोरोनाच्या आजारामुळे केंद्र आणि राज्य सरकारने देशात सुरू असलेल्या लॉकडाउन हद्दीत धार्मिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई आहे.
म्हणूनच यावर्षी रमजान ची ईद ईदगाह व मशिदीत न पठन करता प्रशासनाला पाठिंबा द्यावा, तसेच रातील मुस्लिम समाजातील उलेमा,आणि जबाबदार व्यक्ति यांनीही नमाज घरीच अदा करावी अशी पुष्टी केली आहे, तुम्ही सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन रोचकरी यांनी केले आहे
