काटी : उमाजी गायकवाड
सध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून देशभरात लॉकडाऊन असल्याने सर्व उपहारगृह व खाद्यपदार्थ निर्मीती व विक्री व्यवसाय ठप्प झाल्याने कांद्याचा वांधा झाला असून कांद्याचे भाव कोसल्याने यांचा फटका येथील शेतकरी सिकंदर कुरेशी यांच्यासह अन्य शेतकऱ्यांना याचा आर्थीक फटका बसला आहे.
मागील काही दिवसांपासून कांद्याची खरेदी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होती. परंतु त्यानंतर खरेदी सुरु करण्यात आल्यानंतर सोलापूर येथील आडत बाजारात शेकडोच्या संख्येने कांद्याचे ट्रक दाखल होऊ लागले. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने येथील शेतकरी सिकंदर कुरेशी यांनी आपल्या गट नंबर (1256) मधील दिड एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. चांगल्या भावाच्या अपेक्षेने त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून चांगल्या प्रकारे कांदा पिकाची देखभाल करीत जवळपास 225 बॅगचे उत्पादन घेतले. परंतु सुरुवातीला कांद्याचे भाव 2300 रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोचले होते.
मात्र त्यानंतर लॉकडाऊनचे परिणाम दिसण्यास सुरवात झाली. सर्व प्रकारचे उपहारगृहे व खाद्य पदार्थाच्या विक्रीला ब्रेक बसला. भर उन्हाळ्यात कांद्याची मागणी सुरुवातीला जास्त असताना देखील लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली. सोलापूरात सध्या पुणे, बीड,उस्मानाबाद अहमदनगरसह जिल्ह्यातील सर्वच तालूक्यातून कांद्याची आवक होत आहे. सोलापूर बाजारातून हा कांदा कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामीळनाडू या राज्यात कांदा पाठवला जातो. पण लॉकडाऊनमुळे कांद्याची वाहतूक बंद झाली. त्यासोबत इतर राज्यात स्थानीक माल येऊ लागल्याने मागणी देखील कमी झाली. सर्वच राज्यात खाद्यपदार्थ निर्मीती व हॉटेलींग बंद झाल्याने या अडचणीत भर पडली. आवक जास्त व मागणी कमी या प्रकाराने काटी येथील शेतकरी सिकंदर कुरेशी यांच्या कांद्याचा वांधा झाला असून त्यांचा जवळपास 225 पाकेट कांदा पडून असून कांदा खराब होत असल्याने त्यांनी लागवडीपासून केलेला पंच्च्याहत्तर हजार रुपये खर्चही निघणे मुस्किल झाले आहे. मेहनतीने लागवड केलेल्या कांद्याचे भाव कोसळल्याने काटीसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. हा कांद्याचा वांधा आता कसा सुटणार हाच प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.