तामलवाडी :  सर्जेराव गायकवाड 

कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर संपुर्ण सोलापूर जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या असुन ग्रामीण भागामध्ये शेतातुन, पाणंद रस्त्यांनी ये जा सुरूच असते परंतु कोरोनाचा धोका वाढतच असल्याने जळकोटवाडी,वडगाव काटी ता तुळजापुर येथे काही बागायतदार शेतकरी हे शेजारील सोलापुर जिल्ह्यातील मजुर आणुन कामे करून घेत असल्याने परजिल्ह्यातील मजुरांचा सुळसुळाट वाढत असुन ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे.

      सोलापूर शहरात कोरोना संसर्गाचा धोका वा ंढला असुन कोरोना रूग्णांची संख्या ही दोनशेच्या आसपास पोहचली आहे.शहर व जिल्ह्याबाहेर या जिवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कडक जिल्हाबंदी करण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये जिल्हाबंदीच्या या नियमांना पायदळी तुडवत सर्रास जिल्हबंदीचे उल्लंघन होत असल्याचे दिसुन येत आहे.कोरोना या संसर्गाला काही लोक गांभीर्याने घेताना दिसत नाहीत जळकोटवाडी,वडगाव काटी ता.तुळजापुर येथील काही बागायतदार शेतकरी हे सोलापूर जिल्ह्यातील शेजारीच असलेल्या नान्नज,खेड,रानमसले आदी परीसरातुन मजुर कामावर बोलवत आहेत.हे सर्व मजुर दोनचाकी गाडीवर डबल,टीबलसिट बसुन येत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदीचे उल्लंघन करून दररोज हे मजुर उस्मानाबाद जिल्ह्यातील सिमेवरील गावामध्ये येत असल्याने जळकोटवाडी व वडगाव काटी गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जळकोटवाडीचे सरपंच गणेश डोलारे यानी कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर तेथील बागायतदार शेतकर्यांना सोलापूर जिल्ह्यातील मजुर न आणता आपल्या परीसरातील कामगार, मजुर घेऊन शेतीची कामे करावीत असे सांगितले असता येथील बागायतदार शेतकरी ऐकण्यास तयार नसल्याचे जळकोटवाडीचे सरपंच गणेश डोलारे यानी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणुन पोलिस प्रशासनाने रेड झोन जिल्ह्यातील मजुरांना जळकोटवाडी व वडगाव काटी परीसरात येण्यास निर्बंध घालुन तेथील नागरीकांना दिलासा द्यावा असेही सरपंच गणेश डोलारे यानी बोलताना सांगितले आहे.
 
Top