तुळजापूर : कुमार नाईकवाडी

शहरातील शुक्रवार पेठ भागातील खडकाळ गल्लीतील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या जनरल स्टोअर्स समोरील फरशी व  समोर लावलेली ईर्टीका कारवर अज्ञातांनी दगडे मारुन गाडीच्या काचा फोडुन  सुमारे अठ्ठेचाळीस हजाराचे नुकसान केल्याची घटना घडल्याने  वाहन चालकांन मध्ये घबराहाटीचे वातावरण पसरले सदरील घटना शनिवार दि29रोजी राञी दोन वाजता  घडली.

या पुर्वी दहा ते बारा गाडींचा काचा फोडण्यात आल्या होत्या त्यानंतर काही दिवस जाताच पुन्हा गाड्या फोडण्याचे सञ सुरु झाले आहे.



या बाबतीत अधिक माहीती अशी की, शुक्रवार पेठ भागातील खडकाळ गल्ली परिसरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या सायराज जनरल स्टोअर्स शेजारी लावलेली ईर्टीका  शुक्रवार राञी  अज्ञांतानी  प्रथम जनरल स्टाअर्स समोरील  फरशा फोडल्या त्यानंतर  फुटलेली फरशी घेवुन ईर्टीका कंपनीची गाडी क्रमांक MH25R9258 वर समोरील व पाठीमागील काचावर  मारुन यात काचेचा चक्काचुर होवुन  गाडीचे चाळीस हजाराचे व हाँटेल ची फरशी फुटुन आठ हजार असे ऐकुण अठ्ठेचाळीस  हजार  रुपयाचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. राञीअपराञी फिरणा-यांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
 
Top