तुळजापुर, दि. ३० :
तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे कोरोना बाधित तीन रुग्ण आढळून आल्याने गावातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सिल करण्यात आला. प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपायोजनांची पाहणी केली. तसेच आणखीन नविन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्या सूचनेवरून मास्क व सॅनिटीझर चे वाटप करणयात आले. यावेळी उपस्थित उस्मानाबादचे तालुका प्रमुख सतीश(भैया) सोमाणी, तुळजापूर तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाण,दिनेश हेड्डा,अनिल बागल,आकाश पाटील,किरण चव्हाण,रोहित नागनाथराव चव्हाण,कार्ला तंटामुक्ती अध्यक्ष व्यकट देवकर, पोलीस पाटील उत्तम पाटील, सरपंच सुभाष देवकर, मा.सरपंच माणिक देवकर, शाखाप्रमुख किरण पवार आदि उपस्थित होते.
