होर्टी : बाळकृष्ण मुळे
तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील शेतकरी गणेश सिद्रामप्पा खराडे यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला आहे. यांच्या शेतातून जाणारे विज वाहिन्यांच्या तारा खाली लोंबकाळल्या होत्या. त्यामुळे विद्युत तारांच्या घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या पडून दीड एकर शेतातील उभा ऊस जळून खाक झाला आहे.
24 मे रोजी झालेल्या विद्युत वाहिन्यांच्या घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या पडल्या व ऊस जळून खाक झाला. दुपारी 4 वाजताच्या सुमारास ठिणग्या पडून उभा ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये दीड एकर शेतातील ठिबक जळले आहे. या बाबत माहवितरण कंपनी कडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले......सलग दुसऱ्या वर्षी ह्या शेतकऱ्याचे उसाचे नुकसान झाले आहे...१४ मे २०१९ रोजी ह्या गटातील विद्युत तारांच्या झालेल्या घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या पडून उभा ऊस खाक जळून झाला होता....या वर्षी देखील महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
