तुळजापूर, दि. ३० :
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते माजी न्यायमूर्ती बी.एन.देशमुख यांचे काल दिनांक 29/05/2020 रोजी वृद्धपकाळाने औरंगाबाद येथे राहत्या घरी निधन झाले. या जेष्ठ व अभ्यासू नेत्यास शेतकरी कामगार पक्ष तुळजापूर यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष भाई प्रकाशराव देशमुख यांनी बी.एन. साहेब यांच्या सोबतच्या आठवणीला उजाळा दिला त्यामध्ये प्रामुख्याने आणीबाणी विरोधातील तुळजापूर कोर्टा मध्ये लढलेली केस,मंदिर मधील बकरे बलिदान कायम चालू ठेवण्यात साहेबांचे योगदान ,अश्या अनके आठवणीस उजाळा देण्यात आला,तसेच भाई उत्तम नाना अमृतराव यांनी ही त्यांच्या व्यक्तिमत्व ची व कार्याची माहिती सांगितली ... शेवटी दोन मिनीट स्थब्द उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली...
किरण खपले,युवराज बापू पवार,भालचंद्र अपराध,राजेश देशमुख,उमेश भिसे,राहुल खपले,श्रेयस कुतवळ, नवनाथ जगताप, अनंत क्षीरसागर, इ उपस्थित होते.
