वागदरी : एस. के.गायकवाड
रोजगार हामी योजनेतील जाँबकार्ड धारक मजूर व शेतमजूर असंघटीत कामगार कुटुंबाना किमान पाच हजार अनुदान द्यावे अशी मागणी रिपाइंच्या वतीने तुळजापूर तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रिपाइंच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाँकडाऊनच्या काळात असंघटीत शेतमजूर, रोजगार हमी योजनेतील मजूर कामगारांचे सर्व कामे बंद झाल्याने ते आर्थिक आडचणीत सापडले आहेत.
त्याना आतापर्यंत कसलीही आर्थिक मदत मिळालेली नाही.फक्त मोफत तांदूळ मिळाले पण भाता बरोबर वरण करण्याकरीता तेल, मिठ ,मिरची आणण्यासाठी आर्थिक आडचण निर्माण होत आहे.तरी शासनाने रेशन देण्या पेक्षा जाँबकार्ड धारक कुटुंब प्रमुखाच्या खात्यावर किमान पाच हजार रुपये थेट अनुदान जमा करावे. आशी मागणी करण्यात येत आहे.
रिपाइंच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,नगरसेविका वैशाली कदम,रिपाइं तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
