नळदुर्ग :
कोरोना सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे भारत देशात एकूण एक लाखापेक्षा जास्त कोरोनाची लागण झालेले रुग्ण आहेत. सध्या तरी कोरोनवर कोणतीही लस उपलब्ध नाही. एकूण रुग्णापैकी जवळपास 70 हजार रुग्ण आज बरे होऊन गेले आहेत. कोरोनावर लस जरी उपलब्ध नसली तरी होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम 30 हे औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयोगी ठरत आहे. केंद्रातील आयुष मंत्रालयाने या औषधाला रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून या औषधाची शिफारस केली आहे. केरळ तसेच महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, कोल्हापूर ईत्यादी अनेक कोरोनाबाधित शहरात या औषधाचा वापर केला जात असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे औषध गुणकारी ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाचे वाटप सोशल डिस्टन्सिंग चे वापर करून डॉ. सुधाकर भानुदास मोहोळे, डॉ. जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग शहरातील कोविड योद्धा डॉक्टर, नर्स, आशा सेविका, फार्मसिस्ट, नगरपालिका कर्मचारी, पत्रकार यांना वाटप करण्यात आले आहे यावेळी पत्रकार विलास येडगे, संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, डॉ. आनंद काटकर, कोषाध्यक्ष सागर हजारे, मयूर महाबोले, सुरज आवटे, अतुल हजारे, मयूर पाटील आदी उपस्थित होते.
