जळकोट,दि.२९ : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील राजे शिवछत्रपती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे मुख्य आधारस्तंभ किशोर कदम यांचे दि.१८ रोजी आकस्मित निधन झाले आहे. त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम न करता त्यांचे बंधू ऍड. अंगद कदम व कुटुंबीयांनी कोविड-१९ साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३१००० रुपये दिले आहेत.
सध्या जग कोरोनाच्या महामारीने संकटात सापडले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही कोरोनाने आता हात पसरायला सुरुवात केली आहे. उस्मानाबाद जिल्हाही पूर्णतः भयभीत झाला असून प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन कोरोना विरुद्ध लढत आहेत. उस्मानाबाद कोविड-१९च्या प्रतिबंधासाठी कोरोना-१९ युद्ध सुरू आहे. जळकोट येथील राजे शिवछत्रपती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे मुख्य आधारस्तंभ किशोर कदम यांचे दि.१८रोजी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने जळकोट व परिसर सध्या शोकमग्न आहे. त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम न करता कोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३१००० रुपये त्यांच्या स्मरणात ऍड.अंगद कदम व कुटुंबियांनी दिले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी हा धनादेश उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉ.दीपा मुधोळ- मुंडे यांच्याकडे शुक्रवार(दि.२९)रोजी सुपूर्द करण्यात आला. यावेळी ऍड.अंगद कदम, शिवजन्मोत्सव समितीचे ब्रह्मानंद कदम, शिवराम कदम, उमेश गंगणे आदीजण उपस्थित होते.
