तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

 कोविड- १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील नागरीकाना दि.२५ पासुन मास्क व सॅनिटाइजरचे वाटप करण्यात सुरूवात केली आहे.
  
    कोरीना या संसर्गाचा धोका वरचेवर वाढतच असुन तामलवाडी गावापासुन अवघ्या २० की.मी अंतरावर असलेल्या सोलापूर शहरात कोरीनाचे रूग्ण संख्येत मोठी वाढ होत असल्याने तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातही कोरीनाचे रूग्ण वाढत असल्याने सोलापूर जिल्हाच्या सिमेवर असलेल्या तामलवाडी गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने मास्क व सॅनिटाइजर वाटप करण्याची मागणी यापूर्वीच ग्रामस्थांनी केली होती. त्या अनुषंगाने कोरोनापासुन बचावासाठी दि. २५ पासुन तामलवाडी गावामधील नागरीकाना ५ हजार मास्क व २ हजार सॅनिटाइजर बाटलीचे प्रत्येक कुटुंबाला वाटप करण्यात येत आहे.तसेच दोन तापमापक यंत्रद्वारे आशा कार्यकर्त्या घरोघरी जाऊन नागरीकांचे तापमान तपासणी करत आहेत.बालाजी अमाईन्स व ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये तीन वेळा जंतुनाशक फवारणी करण्यात आली असल्याचेही ग्रामसेवक पी.एन. लाटकर यानी बोलताना  सांगितले.वाटप करण्यात येणार्या मास्कचा नागरीकांनी वापर करावा व अत्यावश्यक असल्यासच मास्क वापरून व हाताला सॅनिटाइजर लावुनच बाहेर पडावे अन्यथा घरीच रहा सुरक्षित रहा असा सल्लाही ग्रामसेवक पी.एन. लाटकर यानी जनतेला दिला आहे.

       यावेळी ग्रामसेवक पी.एन लाटकर, प्र. सरपंच दत्तात्रय वडणे,लिपीक श्रीकांत गायकवाड,शशिकांत गायकवाड,रहेमान जमादार,शिवाजी माळी,दस्तगीर पटेल,आदी उपस्थित होते.
 
Top