तुळजापूर : कुमार नाईकवाडी

संपुर्ण जगभरासह भारतामध्ये कोविड - १९ या विषाणुजन्य महामारीने थैमान घातले आहे. अशा या गंभीर संकटसमयी केंद्र व राज्य शासन प्रयत्नाची पराकाष्टा करून, सर्व देशाला या महामारीपासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. अशा संकटसमयी   लोकमंगल मल्टीस्टेटच्या वतीने उस्मानाबाद जिल्हयामध्ये कोविड़ - १९ आजाराविषयी तपासणीबाबत स्थापित प्रयोगशाळा व संशोधन कार्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांना देण्यात आले.

सोलापूर व तुळजापूर या ठिकाणी कोविंड योद्धे म्हणून कार्यरत असणारे पोलीस यांना मोफत सेंटर पुरवठा अशा विविध मार्गाने लोकमंगल समूह सामाजिक बांधिलकी जपत खारीचा वाटा उचलत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या लॅब मुळे निश्चितच जिल्ह्याची प्रगती होणार आहे सध्याच्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी करत असलेले प्रयत्न व त्यांनी केलेले आव्हान याला प्रतिसाद म्हणून लोकमंगल मल्टीस्टेट च्या वतीने 1 लाख रुपये मदत निधी जाहीर करण्यात आला व सदर निधीचा धनादेश आज रोजी जिल्हाधिकारी सौ दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

यावेळी जिल्हा निबंधक देशमुख, रिजनल मॅनेजर संतोष नाईक, विभागीय अधिकारी ज्ञानेश्वर जमदाडे, विनोद देवकर, मनोज शिंदे, प्रवीण मालखरे, रवी विर, रणजीत भुतेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top