तुळजापूर, दि. 05 :
कोरोनाचा विस्तार रोखण्यासाठी तुळजापूर नगरपालिकेच्या वतीने नगरसेवक अमर (भैय्या) मगर, नगरसेवक अश्विनी रोचकरी, युवा नेते विशाल (भैय्या) रोचकरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मंगळवार दि. (5) मे रोजी सकाळी तुळजापूर येथील नळदुर्ग रोडकडील कुलस्वामिनी हौसिंग सोसायटीमधील सर्व कुटुंबियांची थर्मल स्कॅनिंग मशिनद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली.
या थर्मल स्कॅनिंग मशिनद्वारे तपासणीला येथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून त्याअनुषंगाने तुळजापूर नगरपालिकेच्या वतीने थर्मल स्कॅनिंग मशिनद्वारे घरोघरी जाऊन लोकांची आरोग्य तपासणी केली जात असून लोकांमध्ये तापाची लक्षणे आढळून आल्यास तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात जाण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. थर्मल स्कॅनिंग मशिनद्वारे तपासणी केल्याबद्दल सोसायटीमधील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .
या तपासणीवेळी नगरसेवक अमर (भैय्या) मगर, आनंद जगताप, नगरपालिकेचे कर्मचारी नागेश काळे, महेंद्र पाटील, जयराम माने, वैभव अंधारे अधिकारी आदींसह सोसायटीचे अध्यक्ष अनिल धोत्रे, हरिदास नाईकवाडी, अनिल काशिद,चंद्रकांत कांबळे,मोहन शिंदे,आनंद जगताप,विनेश कांबळे, गुरुनाथ टणके, टाकणे सर डॉ.जाधव आदींची उपस्थिती होती.