तुळजापूर, दि. १२ :

 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा आज जन्मदिवस. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शुश्रुषा शास्त्राची संस्थापिकाही समजले जाते.

आज कोरोनाचे संकट महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण जगावर आले आहे. अशावेळी रुग्णांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. आपल्या कुटुंबाची काळजी व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्यरत असणाऱ्या परिचारिका देवदूता सारखे काम करीत आहेत.या निमित्ताने दिनांक १२ मंगळवार रोजी तुळजापूर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकांना आम्ही सलाम करतो व त्यांचा कार्याचा गौरव करतो असे  उदगार नवनिर्मिती बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्थांच्या अध्‍यक्षा मीनाताई सोमाजी यांनी परिचारका यांचा गौरव करताना बोलत होत्या.

 या वेळेस प्रेरणा बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्ष सौ.संध्या खुरुद, ऐश्वर्या खुरुद डॉक्टर सी.के. बोडके मॅडम, डॉक्टर रोचकरी मॅडम, यांच्या हस्ते परिचारिका भोसले मॅडम, शितल मॅडम, जोशी मॅडम, तोडकरी मॅडम, कांबळे मॅडम,शिरसागर मॅडम, मोरे,मॅडम, वाफळे मॅडम इत्यादी परिचारिका यांचा गुलाब फुल घेऊन गौरव करण्यात आला त्यावेळेस पत्रकार संजय खुरुद, सचिन ताकमोघे व सागर कदम उपस्थित होते.
 
Top