खानापूर : तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील युवकाचा आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयशर टेम्पोच्या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे.

      सोलापूर येथून आयशर टेम्पो क्रमांक MH 25 U 1533 यामध्ये विशाखापट्टणम येथे द्राक्षे घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला विशाखापट्टणमच्या अलीकडे  दि.8 रोजी अपघात झाला. यामध्ये काटगाव येथील आयशर टेम्पोवर क्लिनर म्हणून काम करणारा युवक आरिफ बक्तावर शेख (वय 21) या युवकाचा जागीच मृत्यू  झाला.तर गाडीचा चालक दत्ता क्षीरसागर हा गंभीर जखमी झाला आहे.सध्या त्याच्यावर दवाखान्यात उपचार चालू आहेत. विशाखापट्टणम येथून आरिफचे पार्थिव गावामध्ये आणून  त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आरिफ हा सर्वांशी मनमिळावू ,होतकरू मुलगा असल्याने त्यांच्या जाण्याने गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
Top