खानापूर : बालाजी गायकवाड

 स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या १४ मे २०२० रोजी संपन्न होणाऱ्या जयंती निमित्त सुविचार - राष्ट्र साकार या उदात्त भावनेतुन "एक वादळ विचारांच"  या विचारमंचा तर्फे काव्य स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

     छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून लॉकडाउनच्या काळात कविना व्यासपीठ उपलब्ध करत एक वादळ विचारांच  या विचारमंचा तर्फे काव्य स्पर्धेचे दि. १३ मे पासून सकाळी ८ वाजल्या पासून ऑनलाइन स्पर्धेला सुरुवात होणार असुन तर स्पर्धेचा अंतिम वेळ १४ मे  संध्याकाळी ८ वाजेपर्यंत राहणार आहे.या  स्पर्धेचा विषय हा "छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित कविता" असा असुन जास्तीत जास्त कवींनी सहभागी होण्यासाठी
https://chat.whatsapp.com/IhwKZ55czJhI6LgxkkaTSl या लिंक वर जाऊन एक वादळ विचारांच, या व्हॉट्सऍप गृप मध्ये सामील होऊन आपल्या संपूर्ण पत्त्यासह आपली स्वयरंचित रचना/कविता पाठवावी. असे आवाहन एक वादळ विचारांचं, विचारमंचाचे अध्यक्ष रवि कदम,विचारमंचाचे प्रशासक पत्रकार बालाजी गायकवाड, राहुल कोळी, ज्ञानेश्वर गुरव, मनोज बायस यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी विचारमंचाचे अध्यक्ष रवी कदम यांच्या 8208831740 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top