तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील वडगाव काटी येथे वास्तव्य करत असलेल्या पारधी समाजातील नागरीकांना वडगाव काटी परीसरात असलेल्या सौरऊर्जा यंत्रसंचाचे अधिकारी व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने दि.१२ रोजी अन्नधान्याच्या कीटचे वाटप करण्यात आले.
कोवीड- १९ या विषाणुचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे.या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यामध्ये लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला.या लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये अनेक गरीब ,हातावर पोट असणार्या नागरीकांवर उपासमारीची वेळ आली.हाताला काम नसल्याने रोजच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला.अशा परिस्थितीत प्रशासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानामधुन मोफत धान्याचे वाटप केले परंतु अनेकजण या मोफत धान्यापासुन वंचित राहीले.अशा गरजु नागरीकासाठी अनेक सामाजिक संघटनांनी हातभार लावत अन्न वाटप केले.अशाच वडगाव काटी येथील पारधी वस्तीमधील गरीब व गरजु कुटुंबाला वडगाव काटी व वडाळा गावच्या मध्यभागी असलेल्या सौरऊर्जा यंत्रसंचाचे अधिकारी विश्वजित भोसले व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने दि.१२ रोजी अन्नधान्याच्या कीटचे वाटप करण्यात आले.यावेळी नागरीकांना प्रत्येकांनी मास्कचा वापर करून प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या. या अन्नधान्याच्या किट मिळाल्याचा आनंद त्या गरजु व्यक्तींच्या चेहर्यावर दिसुन येत होता.या स्तुत्य उपक्रमाचे सर्व वडगावकर ग्रामस्थ व पारधी समाजामधुन कौतुक होताना दिसत आहे.
याप्रसंगी सौरऊर्जा यंत्रसंचाचे अधिकारी विश्वजित भोसले,छावा संघटना जिल्हाध्यक्ष विश्वजित चुंगे,कुलस्वामिनी सुतगिरणचे संचालक गौरीशंकर कोडगिरे,सुरज पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.