तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 कोरोना आजाराचा संसर्ग रोखणेसाठी श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानने भोपे पुजारी व विश्वस्तांच्या यापुर्वी झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे दि.१७ मार्च २०२० पासून श्री तुळजा भवानी मंदीरात श्री देविजींच्या दर्शनासाठी भाविकांना शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.श्री तुळजा भवानी देविजींच्या दररोज होणा-या धार्मिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने कोरोना आजाराच्या धरतीवर घ्यावयाची काळजी व रोग नियंत्रणात आणणेसाठी करावयाचे उपाययोजना म्हणून दि.२३ मे २०२० रोजी सकाळी ११:३० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सौ.योगिता कोल्हेमॅडम यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष सचिन रोचकरी,भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम,उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो.पाळकर मंडळाचे नागेश साळूंके,सेवेदारी महंत तुकोजीबुवा,व हमरोजीबुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री तुळजा भवानी मंदीरच्या नवीन प्रशासकीय कार्यालयात बैठक पार पडली.
           
    बैठकीत आगामी काळात मंदीर भाविकांसाठी खुले करण्याबाबत काय काय उपाय केले जावेत,आगामी महिना भर मंदीरात दररोज देविची धार्मिक पुजा करण्यास भोपे पुजारी यांची चार ते पाच नावाप्रमाणे यादी देण्यात यावी,छबीना उत्सवातील संख्या कमी करून तसेच याबाबत काय काय उपाय करता येईल याबाबतची चर्चा,तसेच राजमाता जिजाऊ महाव्दार व देविच्या गाभा-यात प्रवेश करणा-या प्रत्येकांना मदीर संस्थानकडून सॅनिटायझरचा वापर केला जावा असे ठरले.

 बैठकीत मंदीर व्यवस्थापक कोल्हेमॅडम,नगराध्यक्ष सचिन रोचकरी,भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, अनंत कोंडो, तुकोजीबुवा, हमरोजीबुवा, नागेश साळूंके, सिध्देश्वर इंतोले, जयसिंग पाटील, बंडोपंत उपाध्ये, अॅड. डोईफोडे हजर होते.
 
Top