नळदुर्ग, दि.२३ :
येथिल प्रभाग क्र.3 व्यासनगर,माऊली नगर,शनिवारवाडा नळदुर्ग येथे शिधापञिका नसलेल्या व बेघर कुटुंबाना जिवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. तुळजापूर तहसिल कार्यालयाकडुन नळदुर्ग नगरपालिकेस लाभार्थ्याना किट पुरवण्यात आले.
यावेळी पाणी पुरवठा सभापती सौ.सुमन जाधव , पत्रकार विलास येडगे , नितीन कासार ,यांच्या हस्ते ५० किराणा साहित्याचे किट वाटप आज करण्यात आले. यावेळी नवल जाधव तसेच नगरपालिकेचे कर्मचारी पुंड ,भीमसेन भोसले हजर होते.
