तुळजापुर : कुमार नाईकवाडी

कोरोना सारख्या संसर्ग रोगास रोखण्यात असमर्थ ठरलेल्या राज्य सरकारच्या विरोधात दि.२२ शुक्रवार रोजी भा.ज.पा.वतीने शहरातील कार्यकर्त्याच्या वतीने आपल्या घरासमोर अंगनात कोरोना बाबतीत अपयशी ठरलेल्या राज्य सरकारच्या विरोधात काळ्या भिती लावुन काळे कपडे घालुन निषेधाचे फलक लावुन आंदोलन करण्यात आले.

देशभरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामध्ये महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. या कोरोना संकटला जबाबदार आघाडी सरकार चा भोगंळ कारभार असून कोरोना रोखण्यात हे सरकार पुर्ण निष्फळ ठरल्याचे सांगत  भाजपने आज 'माझे अंगण, माझे रणांगण' आंदोलनाची हाक दिली होती. त्यास तुळजापूर येथे भा.ज.पा. च्या वतीने महाराष्ट्र बचावो आंदोलन करुन निषेध व्यक्त करण्यात आला.



 या वेळी तुळजापुर शहरातील भा.ज.पा.चे तालुका खरेदी विक्री संघाचे चेरमन शिवाजी गजानन बोधले परीवाराच्या वतीने तसेच भा.ज.पा.चे गुलचंद व्यवहारे,विकास मलबा, नागेश नाईक,  सुहास सांळुके आदीसह परिवाराच्या वतीने काळ्या फिती लावुन निषेध फलक लावुन राज्य सरकारचा कोरोना वायरस बाबतीत असमर्थ ठरलेल्या सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.




 
Top