तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तालुक्याचे भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता व अंत्यत विश्वासु समजला जाणारा कार्यकर्ता तुळजापुर तालुक्यातील तिर्थ बुद्रक येथील रहीवाशी आसलेला मनोज माडजे याने दि.२१ गुरुवार रोजी रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
यावेळी रा.काँ.चे प्रदेश सरचिटनीस गोकुळ शिंदे, धैर्यशील पाटील, धनंजय पाटील,रा.काँ. युवक चे संदीप गंगणे, सचिन कदम, शरद जगदाळे, महेश चोपदार आदीसह रा.काँ.चे युवक चे कार्यकर्ते उपस्थित होते.
तुळजापुर तालुक्यातील तिर्थ बुद्रुक येथील मनोज माडजे या पुर्वी रा.काँ.चे सक्रीय कार्यकर्ते होते माञ गेल्या विधान सभेच्या निवडणुकीच्या वेळीभा.ज.पा.चे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या सोबत जाण्याचा संकल्प केला होता. माञ त्यांचा संकल्पेनाला ग्रहन लागत असल्यामुळे व त्यांची या राजकीय जिवनात घसरण होत असल्यामुळे रा.काँ पक्षात स्वगही परत जाण्याचा निर्णय घेतला. मनोज माडजे हे तुळजापुर तालुक्यात व शहरात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.
