तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 शहरातील एका भागात मंगळवारी दि१७ रोजी एका २१ वर्षीय  गर्भवती माहिला पुण्याहुन आपल्या कुंटुबासह तुळजापुर आली  होती. या वेळी सदरील माहिलेस तुळजापुर येथील उपजिल्हा रुग्नालय येथे क्वाँरनटाईन करण्यात आले होते.  माञ सदरील माहिलेचे चा स्लँब रिपोर्ट    लातुर येथील विलासराव देशमुख विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले होते. माञ सदरील माहिला पाँजिटिव्ह आढळल्याने तुळजापुर शहरात एकच खळबळ उडाली होती.

 दि.२० बुधवार रोजी येथील आरोग्य विभाग,पोलीस विभाग व न.प.प्रशासकीय यंञनेने जलद गतीने यंञणा राबवुन तुळजापुर येथील एका भागात राहणाऱ्या त्या माहिलेच्या संपर्कात आलेल्या वाहन चालकासह ,त्यांच्या कुंटुबासह ३५ लोकांना तुळजापुर येथील उपजिल्हा रुग्नालयात होम क्वाँरटंन करुन त्या पैकी २३ लोकांचे तपासणी स्लँब  रिपोर्ट लातुर येथील विलासराव देशमुख विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले होते  गुरुवारी सायंकाळी या २३ लोकांचे रिपोर्ट अहवाल निगेटिव्ह आल्याचे तुळजापुर येथील  उपजिल्हा रुग्नालयातील डाँ चंचला बोडके यांनी सांगितले.

 त्यांमुळे तुळजापुर शहरावरचे कोरोना वायरस चे तात्पुरते संकट टळले असले तरी तुळजापुर शहरातील नागरीकांनी कोरोना बाबतीत काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी वारंवार सांगितले आहे.

 दि.३१ में पर्यत अत्यावश्यक सेवा वगळता लाँकडाऊन तुळजापुर शहर लाँकडाऊन करण्यात आले आहे. तरी नागरीकांनी कोरोना बाबतीत गांभीर्याने विचार करुन आपण आपल्या घरात राहावे, रिकामे रस्त्यावर फिरु नये, तुळजापुर शहरातील सर्व प्रशासकीय यंञणा आपल्या साठी मोठे शर्थीचे प्रयत्न करीत आहे. शहरातील नागरीकांनी आपले नातेवाईक मुंबई ,पुणे व इतर भागातील गावातील नागरीक जर तुळजापुर ला आले तर तुळजापुर येथील उपजिल्हा रुग्नालयात होम क्वाँरनटाईन करावे किंवा संबंधित प्रशासकीय यंञेनेस कळवावे तरी शहरातील कोणत्याही नागरीकांनी माहिती दडपून ठेवु नये तुळजापुर येथील आरोग्य विभाग,पोलीस विभाग  तहसील विभाग ,न.प.विभाग सर्वच प्रशासकीय  यंञणा आपल्या शहरासाठी अहोराञ परिश्रम घेत आहे. तरी नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले.
 
Top