तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने दुजाभाव न करता कोरोना विषाणूच्या प्रतिबंधसाठी शासनाने पुकारलेल्या लाँकडाऊच्या काळात  तुळजापूर शहरातील मागासवर्गीय वस्तीतील गरजू गोरगरीब कुटुंबाना अन्न धान्य किटचे वाटप करावे अशी मागणी रिपाइंच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांच्या कडे लेखी निवेद्वारे करण्यात आली आहे.

      कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गेल्या दोन महिन्यापासून देशभरात लाँकडाऊन व संचार बंदी पुकारण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे तुळजापूर शहरात गरजू कुटुंबाना  अन्नधान्य किट चे वाटप केले.परंतु हे किट वाटप करत असताना संस्थानने दुजाभाव केलेला दिसून येत आहे. त्याना मागासवर्गीय वस्ती भिमनगर,सिध्दार्थ नगर,मातंग नगर,पापनस नगर येथील गरजू गोरगरीब कुटुंबाचा  विसर पडलेला दिसतो आहे. तरी वरील मागासवर्गीय वस्तीत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थनच्या वतीने अन्न धान्य किटचे त्वरित वाटप करावे अशी मागणी रिपाइं(आठवले)तुळजापूर शहरशाखेच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 तहसीलदार यांना दिलेल्या नावेदनावर रिपाइंचे एऐजिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम,नगरसेविका वैशाली कदम रिपाइं तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम ,रावन सोनवणे सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
 
Top