उस्मानाबाद, दि. ०५ :  पो.ठा. भुम गु.र.क्र. 18/2020 या गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल फोन, हिरो होन्डा मोटारसायकल, वाहनाचा जॅक, (एकुण किं.अं. 57,000/-रु.) यांसह आरोपी- किरण भिमा काळे उर्फ आब्द्या रा. जाम, ता. भुम यास व पो.ठा. आनंदनगर गु.र.क्र. 28/2020 या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोटारसायकलसह (किं.अं.20,000/-रु.) आरोपी- किरण अनंत पेठे यांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. हि कारवाई स्था.गु.शा. च्या पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, खोडेवाड, सपोफौ- खोत, पोहेकॉ- किसन जगताप, काझी, पोना- अमोल चव्हाण, हुसेन सय्यद, पोकॉ- अविनाश मारलापल्ले, दिपक लाव्हरे, सर्जे यांच्या पथकाने केली आहे.


 
Top