उस्मानाबाद, दि. ०५ : मा.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन दत्ता काशिनाथ तोडकरी रा. नेहरु चौक, उस्मानाबाद यांनी दि. 05.05.2020 रोजी नेहरु चौक येथील भुसार मालाचे दुकान ग्राहकांसाठी चालू ठेवले. तर, याच दिवशी विजय अरुण राऊत रा. गणेश नगर, उस्मानाबाद यांनी पाथ्रुड चौक, उस्मानाबाद येथील त्यांचे केशकर्तनालय चालू ठेउन ग्राहकांची गर्दी केली असल्याचे पो.ठा. उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 271 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे दि. 05.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.
 
Top