ढोकी, दि. १२ :
हरिश्चंद्र गोविंद मगर रा. वाघोली (वरुडा), ता. उस्मानाबाद यांनी दि. 10.05.2020 रोजी 13.30 वा. सु. पळसप ते मुरुड रोडलगत राजेंद्र तुपे यांच्या शेताजवळील खडी केंद्रावर खडीने भरलेला डंपर क्र. एम.एच. 04 एफके 3214 हा निष्काळजीपणे पाठीमागे घेतल्याने डंपरच्या मागे काम करत असलेल्या पदमीणी भूजंग जाधव वय 37 वर्षे, रा. वडगांव (सि.) ता. उस्मानाबाद यांच्या अंगावर डंपरचे चाक जाउन त्या जागीच मयत झाल्या. अशा मजकुराच्या तुकाराम भागवत जाधव रा. वडगांव (सि.) यांच्या फिर्यादीवरुन वरील डंपर चालकाविरुध्द भा.दं.वि. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा दि. 12.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.