नळदुर्ग, दि. ०६ :
मुनिर फकीरसाब शेख रा. किल्लागेट, नळदुर्ग, ता. तुळजापूर हे दि. 22.04.2020 रोजी नळदुर्ग येथे पोलीस नाकाबंदी दरम्यान गोवा गुटखा चे 15 पोते एकुण किं.अं. 1,05,000/- रु. चा माल शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ इंडीका कार क्र. एम.एच. 25 ए 3037 मध्ये अवैध वाहुन नेत असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळले. अशा प्रकारे वरील व्यक्तीनी शासन प्रतिबंधीत अन्नपदार्थ बाळगल्याने तो माल जप्त करण्यात आला. सदर पदार्थ हा प्रतिबंधीत अन्नपदार्थ असल्याची खात्री करुन अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपी विरुध्द गुन्हा दि. 05.05.2020 रोजी दाखल करण्यात आल आहे.
