तुळजापूर, दि. ५ :
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व संस्कार भारती चे संस्थापक डॉक्टर हरिभाऊ वाकणकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने तुळजापुरात सामाजिक अंतर राखून प्रतिमापूजन संपन्न झाले.
तुळजापूर संस्कार भारतीच्या वतीने विश्वास नगर येथे संस्कार भारती चे संस्थापक डॉक्टर हरिभाऊ वाकणकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन देवगिरी प्रांताचे सहमंत्री संघटन डॉ. सतीश महामुनी व तुळजापूरच्या अध्यक्ष पद्माकर मोकाशे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. लॉक डाऊन असल्यामुळे सामाजिक अंतर राखून साध्या स्वरुपात प्रतिमापूजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रांताचे सहमंत्री डॉक्टर सतीश महामुनी यांनी हरिभाऊ वाकडकर यांच्या जीवन चरित्राचा परिचय करून देताना त्यांनी भीमबेटका येथे केलेल्या शोध कार्याची माहिती दिली, कला क्षेत्रामध्ये संस्कार भारती आणि संस्कार भारती मध्ये हरिभाऊ वाकडकर यांचे कार्य समाजाने नोंद घेण्यासारखे आहे आणि आणि सर्व कलावंतांनी अनुकरणीय आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. अध्यक्ष पद्माकर मोकाशी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शंकरराव पवार, महेश चोपदार, गुलचंद व्यवहारे, सुधीर महामुनी, अविनाश धट, बाळासाहेब श्यामराज, महेश कुलकर्णी, विश्वनाथ प्रयाग यांची उपस्थिती होती. समितीचे महामंत्री सुधीर महामुनी आणि कोषाध्यक्ष अविनाश धट यांनी प्रतिमेवर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.