तुळजापूर : कुमार नाईकवाडी

कोरोना विषाणू चा संसर्ग रोखण्यासाठी. प्रशासनाच्या आणि तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.येथील सारा गौरव कॉलनी मधील तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने नगरसेवक पंडितराव जगदाळे यांच्या मार्गदर्शना खाली सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी थर्मल स्क्रिनिंग मशीन ने करण्यात आली.
                
यावेळी नगर सेवक पंडितराव जगदाळे, नगर सेविका सौं मंजुषा ताई देशमाने, सामनव्यक  अधिकारी श्री.व्ही. व्ही.पाठक, सर्व्हेअर श्री. टी.डी.मोटे, मायक्रो सर्वेअर पी. डी. भोजने सह सर्वेअर श्री. साळुंके बालाजी,श्री. थोरात एम.एस. यांनी सारा गौरव कॉलनी मध्ये तपासणी केली.

या तपासणी वेळी सारा कॉलनी मधील कोविड विषाणू निर्मूलन समिती सदस्य श्री. विश्वजित पाटील तसेच आबा कापसे, श्री. प्रभाकर चव्हाण सर, प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर ,श्री.सूर्यकांत भांजी,श्री. बाळासाहेब चिखलकर,श्री.लंगडे यांनी सहकार्य केले.
 
Top