तुळजापुर : कुमार नाईकवाडी
गेल्या 30 दिवसापासून सुरु असलेल्या अन्नदान उपक्रमातंर्गत तुळजापुर शहरातील मंगळवार पेठ,वासुदेव नगर, जिजामाता नगर, भोसले गल्ली, धाकटे तुळजापूर(प्र.क्र.1,प्र.क्र5,प्र,क्र.3,प्र.क्र.8,9) येथिल मुस्लीम बांधवांना नुकतीच ईफ्तार पार्टी देण्यात आली या मध्ये बिर्याणी,खजूर,जिलेबीचे घरपोच वाटप करण्यात आले.
या अन्नदान उपक्रमास गजानन(आप्पा) हंगरगेकर,शशी (आप्पा) ज्योत यांच्या वतिने 160 किलो चिकण व प्रसाद मुळे यांच्या कडून 40 किलो जिलेबी , सभापती विजयकुमार गंगणे यांच्याकडून खजूरचे वाटप करण्यात आले.
सदरील वाटपा दरम्यान नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी,विनोद (पिटू) गंगणे,नगरसेवक पंडितराव जगदाळे,नगरसेवक विजय आबा कंदले,माऊली भोसले,अभिजित कदम.विनोद पलंगे.नानासाहेब लोंढे,आंबरिश जाधव,संतोष आप्पा इंगळे,युवा नेते आनंद कंदले,रईस सिद्दिकी,तौफिक शेख,गणेश भिंगारे,श्रीनाथ शिंदे, आदी उपस्थित होते.