तुळजापूर : कुमार नाईकवाडी
तुळजापूर तालुक्यातील आरळी बु येथील प्रवीण व्हरकट यांच्या तुळजाई फिशरीच्या वतीने पंतप्रधान सहायता निधीसाठी 25 हजार व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 25 हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे देण्यात आला.
आरळी बु येथील तुळजाई फिशरीचे प्रमुख प्रवीण व्हरकट,भास्कर व्हरकट, प्रशांत व्हरकट यांच्या माध्यमातून ही मदत दिले गेली आहे,तहसीलदार सौदागर तांदळे यांना 50 हजार रुपयांचे धनादेश देताना गाव तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष किरण व्हरकट, उपसरपंच डॉ, व्यंकट पाटील,जालिंदर माने,सचिन बंडगर, पत्रकार संघाच्या तुळजापूर शहराध्यक्ष कु.किरण चौधरी,तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे,नायब तहसीलदार संदीप जाधव,मंडळ अधिकारी अमर गांधले,पत्रकार अनिल आगलावे यांची उपस्थिती होती.