तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी
मातेच्या दरबारातील आई तुझा आशिवार्द पुजा साहीत्य भांडार, यांच्या कडून  नुकताच  शहरातील श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर अवलंबून असणाऱ्या गरजवंत  कष्टकरी पुजारी बांधवांना  कोरोना (covid19) सारख्या महाभयंकर रोगामुळे निर्माण झालेल्या लॉक डाऊन परिस्थितीमध्ये एकूण 301  कुटुंबांना अन्नधान्याच्या किट उपलब्ध करून देऊन त्यांच्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवण्यास सहकार्य केले..

  आपल्या मिळकतीतून गरजू पुजारी बांधवांना मदत केली.  तसेच सर्व समाजाला आवाहन केले की, कोरोना (COVID 19) या संसर्गजन्य साथ रोखण्यासाठी घरात राहून  महाराष्ट्र शाषनाच्या आदेशाचे पालन करावे कृपया घरात आपण थांबावे आपल्या कुंटुबाची काळजी घ्यावी असे आव्हानही करण्यात आले.


 
Top