तुळजापुर, दि. ०७ : कुमार नाईकवाडी

  •  येथील तुळजापुर नगर परिषद कडून मुख्याधिकारी आशिष लोकरे व तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या कडुन दि.७ गुरुवार रोजी शहरातील नागरीकांना कांही सुचना करण्यात आल्या आहेत.               

सध्या कोरोना वायरस चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपले दैन दिन कामकाज करताना सुचनाचे काटेकोर पालन करणे अंत्यत आवश्यक आहे.१) प्रत्येक नागरीकांनी तोडांवर मास्क लावावा. २) सोशल डिस्टन्सींगचे काटेकोर पालन करावे .  ३) न.प.कार्यालया मध्ये फार महत्त्वाचे काम असल्यास प्रवेश करावा........... ४) नियमीत आपले हात साबनाने स्वच्छ धुवावेत ५) न.प.कार्यालयास कोणत्याही स्वरुपाचा अर्ज लेखी स्वरुपात देण्याऐवजी तो ईमेलद्वारे सादर करावा.अथवा पोस्टा मार्फत ही अर्ज करु शकता ६) आपला परिसर स्वच्छ ठेवावा व आपल्या परिसरातील नागरीकांना कोरोना वायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवृत करा.७) प्रशासनाने वेळो वेळी दिलेल्या सुचनाचे काटेकोर पालन करावे. वरील सर्व सुचनाचे काटेकोर पणे अमलबजावनी करुन कोरोना वायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी नगर परिषदेस सहकार्य करावे.
 
Top