तुळजापुर : कुमार नाईकवाडी
एकी कडे लाँकडाऊनमुळे घरात राहिल्याशिवाय पर्याय नसताना दुसरीकडे तापमानाचा मोठा पारा वाढत आहे आशा परस्थितीत घरात थांबणे मोठे जिकरीचे झाले आहे. रोजच तुळजापुर च्या तापमानाचा मोठा पारा वाढतच आहे. मागिल कांही दिवसापासुन तुळजापुर च्या तापमानात दररोज वाढच होत असल्याचे दिसुन येत आहे सुर्य आग ओकत असल्याने तुळजापुरकर चांगलेच तापले आहेत.
वाढत्या उष्माघाताने तुळजापुरकर हैराण झाले आहेत तापमानात दररोज वाढ होत असताना म.रा.वि.मंडळाकडून विजेचा लपडांव होत आहे. वाढत्या उष्म्याने तुळजापुरात उष्णतेची लाट आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सकाळपासुनच अंगातुन घामाच्या धारा काढणार्या उष्म्याने दुपारी अंगाची लाही,लाही होत आहे गुरुवारी सकाळपासुनच उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणावर जानवत होत्या सकाळपासुनच अंग घामाघूम होत आहे तसेच शहरातील अनेक घरात राञीपासुन सुरु केलेले पंखे आज दिवसभर चालुच होते. उन्हाचा अधिक पारा वाढत चालल्यामुळे शहरातील नागरीक मोठे हैराण होत आहे.
